पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात;’ती’ मुलं दिव्यांग जन्माला येतील!
4 हजारांवर लोकांनी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून कोट्यावधी रूपये कमावले.
पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात;’ती’ मुलं दिव्यांग जन्माला येतील!
4 हजारांवर लोकांनी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून कोट्यावधी रूपये कमावले.
अकोला; प्रतिनिधी
माझ्या भाषणांचे व्हिडिओ परवानगी घेतल्याशिवाय यू ट्यूबवर अपलोड करून नका, असा इशारा देणारे आणि यासंबंधी अनेकदा तक्रारी केलेले समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी आता यू ट्यूबर्सना थेट ‘शाप’च दिला आहे. ‘माझ्या भाषणाचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील,’ असं वक्तव्य इंदुरीकरांनी केलं आहे.
‘ या वादग्रस्त विधानानंतर आता ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अकोला शहरातील कोलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं किर्तन आयोजित केलं होतं. यावेळी निरुपणा करताना इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका केली.
विविध वक्तव्यांमुळं सतत चर्चेत आणि वादात राहणाऱ्या इंदुरीकरांच्या अशा वक्तव्यात याची आणखी एक भर पडली आहे. मात्र, आपण अडचणीत येण्याचं खापर त्यांनी यूट्यूबर्सवर फोडलं आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा यावरून टीका केली होती.
इंदुरीकर महाराज यावेळी बोलताना म्हणाले, की माझ्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून कोट्यावधी रूपये कमावले. याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलं असल्याची तक्रार इंदुरीकर महाराजांनी केली. याच कारणामुळे अशा लोकांबद्दल राग व्यक्त करत माझे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांना दिव्यांग मुलं होतील, त्यांचं चांगलं होणार नाही, असं ते म्हणाले.
, माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांना पैसे मोजायलाही वेळ नाही. मात्र त्यांच्यामुळेच मी सतत अडचणीत आलो आहे. माझ्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील,’ असं इंदुरीकर यांनी म्हटलं आहे. उपस्थितांनी त्यांना टाळ्या वाजवून साथही दिली. अकोल्यातील कौलखेड भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यानं एका कार्यक्रमानिमित्त इंदुरीकर यांचं कीर्तन आयोजित केलं होतं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.