पुन्हा एकदा बंडा तात्यांची जीभ घसरली,महात्मा गांधींबाबत बंडातात्या कराडकरांचं वादग्रस्त वक्तव्य!
पुण्याच्या राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरूंच्या स्मुर्तीस्थळावर कराडकर यांच्या प्रवचनच आयोजन करण्यात आले होते.
पुन्हा एकदा बंडा तात्यांची जीभ घसरली,महात्मा गांधींबाबत बंडातात्या कराडकरांचं वादग्रस्त वक्तव्य!
पुण्याच्या राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरूंच्या स्मुर्तीस्थळावर कराडकर यांच्या प्रवचनच आयोजन करण्यात आले होते.
पुणे :प्रतिनिधी
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्तेत असलेले ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. भारताला मिळालेलं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने नव्हे तर क्रांतिकारक चळवळीने मिळालं. हे पटवून देताना वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींचा उल्लेख म्हातारा असा केला. अन् पुन्हा एकदा बंडा तात्यांची जीभ घसरली.
1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले ते अंहिसेच्या मार्गाने नाही तर 1942 क्रांतीकारक चळवळ उभी राहिली त्या चळवळीचा बोध इंग्रजांनी घेतला. कुठतरी सांगितले जाते की देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘साबरमती के संत तुन्हे कर दिया कमाला मिली हमें आजादी बिना खंड बिना ढाल’ असं म्हणणं म्हणजे झाशीच्या राणीसह 350 क्रांतीकारकांचा अपमान असल्याची टीका कराडकरांनी केली.
क्रांतीकारक भगतसिंगाच्या मनात महात्मा गाधींची छाप होती. मात्र महात्मा गांधीजीचा अंहिसावाद भगतसिंगाच्या मनात ठसावला होता. आपल्या देशाला स्वातंत्र अंहिसक मार्गाने मिळवायचे हा भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. जालियनवाला वाला हत्याकांडाला गाधींनी समर्थन द्यायला नकार दिल्यानंतर भगतसिंग आणि गांधीजी यांच्यात नाराजी उभी राहिली, असंही कराडकर म्हणाले.
बंडा तात्या कराडकर नेमकं काय म्हणाले…
‘..तर तो 350 क्रांतीकारकांचा अपमान ठरेल’
बंडातात्या पुढे म्हणाले की, असं सांगितलं जातं की स्वातंत्र्यासाठी साबरमती के संत तुने कर दिया कमाल, मिली हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल… पण असं म्हणणं म्हणजे झाशीच्या राणीसह 350 क्रांतीकारकांचा अपमान आहे. शहीद भगतसिंग यांच्या मनात महात्मा गांधींची छाप होती. गांधीजींचा अहिंसावाद त्यांच्या मनात ठसवला होता. मात्र, आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायचं आहे. पण हा भगतसिंग यांचा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. कारण, 1922 ला एक हत्याकांड झालं. त्या हत्याकांडामध्ये त्याला समर्थन देण्यासाठी म्हणून महात्मा गांधींनी नकार दिला. त्यावेळी भगतसिंग महात्मा गांधींवर नाराज झाले.