बारामतीत रिलायन्स पेट्रोल (सराफ पेट्रोलियम) पंपावर शासनाच्या अँब्यूलन्स ला मोफत डीझेल…
30 जून 2021 पर्यंत डिझेलविना कुठेही थांबणार नाहीत.

बारामतीत रिलायन्स पेट्रोल (सराफ पेट्रोलियम) पंपावर शासनाच्या अँब्यूलन्स ला मोफत डीझेल…
30 जून 2021 पर्यंत डिझेलविना कुठेही थांबणार नाहीत.
बारामती वार्तापत्र
कोरोनावर मात करण्यासाठी समाजातील विविध घटक वेगवेगळ्या मार्गांनी मदतीचा हात पुढे करत आहे. आता रिलायन्सने थेट रुग्णवाहिका व ऑक्सिजनवाहतूक करणा-या वाहनांना कमाल 50 लिटर डिझेल मोफत देण्याचा मोठा निर्णय घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. बारामतीतील रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर कालपासून ही योजना कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती रोहित सराफ यांनी दिली.
जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेच्या कोरोना काळातील वैद्यकीय आपत्कालीन उपाययोजना करणाऱ्या सर्व रुग्णवाहिकांना येत्या 30 जून 2021 पर्यंत प्रति दिन, प्रति वाहन कमाल 50 लिटर पेट्रोल व डिझेल मोफत पुरवले जाणार आहे. यासाठी रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड कंपनीने पुढाकार घेतला असून, पुणे जिल्ह्यासाठी ही सर्वात चांगली खुशखबर आहे.
बारामतीत ही सुविधा देण्यात आली आहे. रुग्णवाहिकांमार्फत रुग्णांची ने आण केली जाते, ही बाब विचारात घेत रिलायन्सने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या वतीने जो पर्यंत ही योजना राबवली जाणार आहे तो पर्यंत या वाहनांना मोफत डिझेल पुरवठा केला जाणार असल्याची माहिती रोहित सराफ यांनी दिली
कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत रिलायन्स कंपनीने देशभरासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली. बारामतीत उपविभागीय अधिकारी यांचे पत्र असलेल्या रुग्णवाहिका, ऑक्सिजन टँकर तसेच ऑक्सिजन सिलिंडर्सची वाहतूक करणा-या वाहनांना एका वेळेस कमाल 50 लिटर डिझेल पुरविले जाणार आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व वाहनांची यादी आयुष प्रसाद यांनी रिलायन्स कंपनीकडे दिली आहे. आता येत्या 30 जून 2021 पर्यंत शासनाच्या वाहनांना, जी वाहने कोरोना च्या काळामध्ये रुग्णांची सेवा करत आहेत, ती डिझेलविना कुठेही थांबणार नाहीत. त्याचबरोबर शासकीय रुग्णवाहिका इंधनाच्या बाबतीत कुठल्याही अडथळ्याशिवाय धावतील आणि त्याची तोशीस सरकारी यंत्रणेवर पडणार नाही. रिलायन्स कंपनीने हा पुढाकार घेतल्याबद्दल स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी देखील त्याचे कौतुक केले आहे.