इंदापूर
पूनर्वसन सल्लागार समिती सोलापूरचे सदस्य खंडू झेंडे यांचे निधन
चाळीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात होते कार्यरत
पूनर्वसन सल्लागार समिती सोलापूरचे सदस्य खंडू झेंडे यांचे निधन
चाळीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात होते कार्यरत
इंदापूर : प्रतिनिधी
पूनर्वसन सल्लागार समिती सोलापूरचे सदस्य खंडू किसन झेंडे (वय ६५ वर्षे) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने रविवारी (दि.१०) झेंडेवस्ती (पडस्थळ,ता.इंदापूर) येथील रहात्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सुन,नातवंडे असा परीवार आहे.गेल्या चाळीस वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते.डॉ.बाबा आढाव, स्वातंत्र्यसेनानी दिवंगत नागन्नाथअण्णा नायकवडी यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते.