पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात” – करिअर कट्टा उपक्रमांतर्गत टि. सी. महाविद्यालयांत सामाजिक उपक्रम
शैक्षणिक मदत पोहोचविण्याच्या उद्देश

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात” – करिअर कट्टा उपक्रमांतर्गत टि. सी. महाविद्यालयांत सामाजिक उपक्रम
शैक्षणिक मदत पोहोचविण्याच्या उद्देश
अलीकडील मराठवाडा भागातील भीषण पुरामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन विस्कळीत झाले आहे. त्यांना शैक्षणिक मदत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत समाजाप्रती आपली जबाबदारी जपली. या उपक्रमातून एकूण ₹१५,०००/- (रुपये पंधरा हजार) इतकी रक्कम जमा झाली असून ती Maharashtra Information Technology Support Centre – Disaster Relief Fund या खात्यावर पाठविण्यात आली आहे.
या रकमेच्या माध्यमातून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणात सातत्य राहील व त्यांना नव्याने उभे राहण्यास मदत होईल.
या उपक्रमात करिअर संसद मंत्री, सदस्य, विद्यार्थी, करिअर कट्टा टीम, सर्व शिक्षकवर्ग, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सर्वांनी एकत्र येऊन समाजोपयोगी कार्याचा सुंदर आदर्श निर्माण केला.
कार्यक्रमाचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मा. प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य व विभागप्रमुख यांनी केले. या उपक्रमाचे समन्वयन प्रा. सलमा शेख (करिअर कट्टा समन्वयक) यांनी केले.
महाविद्यालय प्रशासनाने या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही असे विद्यार्थी-केंद्रित आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.