आमच्याच गावात आम्हालाच जेवायला बसून देत न्हाय??? हाॅटेलमध्ये जेवायला बसू दिले नाही म्हणून ११ जणांनी मिळून हाॅटेल मॅनेजर ला केली जबर मारहाण…

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून तातडीने दखल

आमच्याच गावात आम्हालाच जेवायला बसून देत न्हाय??? हाॅटेलमध्ये जेवायला बसू दिले नाही म्हणून ११ जणांनी मिळून हाॅटेल मॅनेजर ला केली जबर मारहाण…

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून तातडीने दखल

क्राईम ; बारामती वार्तापत्र

बारामती रस्त्यालगत काऱ्हाटी  येथील  मल्हारराज हॉटेलवर बारा जणांच्या टोळक्याने धुडगूस घालून कोल्ड्रिंक्सच्या बाट्ल्या ,खुर्च्या , सि.सि . कॅमेरा स्क्रीन  , हॉलच्या किडक्यांच्या काचा फोडून  मोठे नुकसान केले आहे .    तसेच हॉटेलच्या वेटरच्या डोक्यात  कोल्ड्रिंकच्या बाटल्या फोडल्या असल्याची घटना घडली .या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये हॉटेल च्या वेटरला  मारहाण व नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की मोरगाव बारामती रस्त्यावरील काऱ्हाटी  गावानजीक असणाऱ्या  मल्हारराज हॉटेलवर काल दिनांक 3 रोजी सायंकाळी ६:४५  मिनिटांचा दरम्यान या  ईंद्रजीत सोनवणे व नितीन खोमणे ईतर चार व्यक्तीसह हॉटेलमध्ये  प्रवेश करून आम्हाला येथे  जेवायला बसायचे आहे  असे सांगितले . यानंतर हॉटेलचा वेटर कुमारपाल याने  तुम्हाला येथे जेवता येणार नाही पार्सल घेऊन जाता येईल असे सांगितले यावर आरोपी नंबर 2 खोमणे याने  मी इथलाच आहे तुम्हाला बघून घेतो असे सांगितले  व निघून गेला  .

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून तातडीने दखल
दरम्यान घडलेल्या या घटनेनंतर आज दुपार पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. तो दाखल होऊ नये, यासाठी काही जण मध्यस्थी करत होते, मात्र सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ पाहून उपमुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने यात लक्ष घातले व जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घालून या संदर्भात सूचना केली. त्यानंतर मात्र पोलिस तपासाची चक्रे वेगाने फिरली.

त्यानंतर ऱात्री ८: ४५  दरम्यान वरील दोन आरोपी व  इतर दहा जणांच्या टोळक्याने हॉटेलच्या गेटवरुन उद्या टाकून  प्रवेश केला . हॉटेल मधील खुर्च्यांचे मोठे नुकसान केले आहे .कोल्ड्रिंकच्या  बाटल्या  फोडल्या तसेच वेटरच्या  डोक्यात कोल्ड्रिंग ची बाटली फोडली. तसेच मॅनेजरलाही मारहाण केली .   सीसीटीव्ही कॅमेऱ्याची स्क्रीन फोडली असुन हॉलच्या काचाही फोडल्या  याप्रकरणी हॉटेलचा मॅनेजर  स्वप्नील राजेंद्र गायकवाड यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये  दाखल केलेल्या तक्रारीनुसार या हॉटेलमध्ये धुडगूस करणाऱ्या बारा जणांच्या टोळक्यावर  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Back to top button