वडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील जिल्हा परिषद शाळेत घरफोडी केलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखे कडून जेरबंद। घरफोडीचा गुन्हा उघडकीस
गुन्ह्यातील चोरीस गेलेले कॉम्पुटर स्क्रिन्स, व शाळेतील मुलांचे पोषण आहाराची भांडी असा मुद्देमाल जप्त

वडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील जिल्हा परिषद शाळेत घरफोडी केलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखे कडून जेरबंद। घरफोडीचा गुन्हा उघडकीस
गुन्ह्यातील चोरीस गेलेले कॉम्पुटर स्क्रिन्स, व शाळेतील मुलांचे पोषण आहाराची भांडी असा मुद्देमाल जप्त
क्राईम;बारामती वार्तापत्र
दि 12/12/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सदर पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मौजे मुढाळे तालुका बारामती जिल्हा पुणे गावच्या हद्दीत जिल्हा परिषद शाळेची घरफोडी ही इसम नामे राजेंद्र जाधव व त्याचे इतर साथीदार यांनी मिळून केली आहे.
सदरची माहिती मिळताच राजेंद्र जाधव यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदरच्या घरफोडी बाबत विचारपूस केली असता त्याने सदरची घरफोडी ही त्याचे साथीदारांसोबत केले असल्याचे सांगितले आहे त्यांची नावे खालील प्रमाने 1) राजेंद्र मारुती जाधव वय 28 वर्ष रा. मुढाळे तालुका बारामती जिल्हा पुणे 2) लक्ष्मण मल्हारी सकाटे वय 31 वर्ष राहणार मुढाळे तालुका बारामती जिल्हा पुणे 3) राहुल वसंत सकाटे वय 20 वर्ष राहणार मुढाळे तालुका बारामती जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरची घरफोडी केल्याचे सांगितल्याने सदर इसमांना वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 344/2021 भा द वि क 454 457 380 या गुन्ह्याचे पुढील तपास कमी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
नमूद आरोपीं द्वारे गुन्ह्यातील चोरीस गेलेले कॉम्पुटर स्क्रिन्स, व शाळेतील मुलांचे पोषण आहाराची भांडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरील कारवाई ही
मा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख , मा.अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके सहा पोलिस निरीक्षक संदिप येळे
पो हवा रविराज कोकरे ,पो हवा आसिफ शेख ,पो ना अभिजित एकशिंगे ,पो ना स्वप्निल अहिवळे चा पो हवा राजापुरे यांनी केली आहे.