पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच दिवसातली चौथी वाढ;जाणून घ्या आजचे दर
तेल कंपन्यांनी कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळेही दरवाढ केली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच दिवसातली चौथी वाढ;जाणून घ्या आजचे दर
तेल कंपन्यांनी कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळेही दरवाढ केली आहे.
नवी दिल्ली;प्रतिनिधी
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एका वाढ झाली आहे. नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही दिलासा मिळताना दिसत नाहीये. तेल कंपन्यांनी 5 दिवसांत 4 वेळा किंमतींमध्ये वाढ केली आहे. आजंही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये 80 पैशांची वाढ झाली आहे.नवीन दर शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाले आहेत.
मुख्य शहरांमधील पेट्रोलचे दर –
मुंबई – मुंबईमध्ये शुक्रवारच्या तुलनेत पेट्रोलच्या किमतीत शुक्रवारच्या तुलनेत 84 पैशांनी वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोलचे दर 112.51 रुपये प्रतिलिटर इतके आहेत.
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे, याठिकाणी आज पेट्रोलचे दर 97.81 रुपये प्रतिलिटर आहेत.
उत्तर प्रदेश आणि, पंजाब सारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी 4 नोव्हेंबरपासून किमती स्थिरावलेल्या होत्या ज्या काळात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे USD 30 ने वाढली होती. 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लवकरच दरात सुधारणा अपेक्षित होती परंतु ती पुढे ढकलण्यात आली. कच्च्या तेलाच्या (इंधन उत्पादनासाठी कच्चा माल) किंमती नोव्हेंबरच्या सुरुवातीस USD 82 च्या तुलनेत प्रति बॅरल 117 पर्यंत वाढूनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये विक्रमी 137 दिवस सुधारणा न करणाऱ्या तेल कंपन्यांनी आता ग्राहकांना दरवाढ दिली आहे.
म्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.