प्रभाग पद्धत बंद करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांच्या संदर्भात रिपाइंचे तहसीलदारांना निवेदन
रिपाइंचे जिल्हा संघटक शिवाजी मखरे यांसह प्रमुख पदाधिकारी होते उपस्थित

प्रभाग पद्धत बंद करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांच्या संदर्भात रिपाइंचे तहसीलदारांना निवेदन
रिपाइंचे जिल्हा संघटक शिवाजी मखरे यांसह प्रमुख पदाधिकारी होते उपस्थित
इंदापूर : प्रतिनिधी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्यभर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांसमोर रिपाइंच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात निदर्शने व आंदोलने होत आहेत.त्याच मागण्यांच्या अनुषंगाने बुधवारी ( दि.२० ) इंदापूर तालुका रिपाइंच्या वतीने तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
ओबीसींची जातिनिहाय जनगणना करावी,मराठा आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, महाराष्ट्रातील काही महापालिका वगळता नगरपालिकांमध्ये शासनाने प्रभाग पद्धत राबवली आहे.ती पद्धत बंद करून एक व्यक्ती एक मत ही पद्धत राबवावी.महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळातील सन २०१८-१९ मध्ये ४ व ५ लाख रुपयांच्या मंजूर असणाऱ्या प्रकरणांची रक्कम त्वरित लाभार्थ्यांना वितरित करावी.मागासवर्गीय लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना कडक शासन करावे तसेच पंतप्रधान घरकुल योजना,रमाई आवास योजनेतील घरकुल प्रकरणे त्वरित मंजूर करून त्याचा निधी लाभार्थ्यांना त्वरित मिळावा अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
यावेळी रिपाइंचे जिल्हा संघटक सचिव शिवाजी मखरे,बारामती लोकसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे,तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, शहराध्यक्ष अमोल मिसाळ,राकेश कांबळे,नितीन झेंडे,भारत सावंत,अर्जुन चितारे,महेश सरवदे,प्रवीण मखरे,राजू घाडगे उपस्थित होते.