पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे प्रश्नमंजुषा स्पर्धेत घवघवीत यश!
प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी आनंद व्यक्त करत विजेत्यांचे विशेष कौतुक

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे प्रश्नमंजुषा स्पर्धेत घवघवीत यश!
प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी आनंद व्यक्त करत विजेत्यांचे विशेष कौतुक
इंदापूर प्रतिनिधी –
माळेगाव येथील SVPM’S Institute of Technology & Engineering (ITE) संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक इंदापूरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, तांत्रिक ज्ञान आणि तर्कशक्तीचा उत्कृष्ट वापर करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत राज्यस्तरावरील विविध डिप्लोमा अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून संस्थेचा नावलौकिक वाढवला.
स्पर्धेतील विजेते विद्यार्थी द्वितीय क्रमांक : हुलगे ज्ञानेश्वरी शिवाजी,दुधनकर प्राची समीर तृतीय क्रमांक : राऊत वैशाली विजय,रासकर माधवी गणेश
या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत विविध क्षेत्रांतील प्रश्नांना अचूक आणि जलद उत्तर देत आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा प्रभावी उपयोग आणि प्रभावी उत्तरांमुळे परीक्षकांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी आनंद व्यक्त करत विजेत्यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक, इंदापूर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेचा लौकिक उंचावला आहे. हे यश त्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे.”
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच, विद्यार्थ्यांच्या यशात पालकांच्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा आहे, अशी भावना यावेळी संगणक अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा सदानंद भुसे यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवाविषयी सांगताना संस्थेच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “या यशाचे खरे श्रेय आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि आमच्या अथक मेहनतीला जाते,” असे हुलगे ज्ञानेश्वरी हिने सांगितले.
विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक, इंदापूरमधील विद्यार्थ्यांची ही कामगिरी निश्चितच प्रेरणादायी आहे. आगामी काळात ही संस्था आपल्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सृजनशील आणि तांत्रिक क्षमतांचा उत्कृष्ट विकास घडवत राहील, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.