शैक्षणिक

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

दहावीमध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

दहावीमध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

बारामती वार्तापत्र

बारामतीतील बांदलवाडी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेच्या क्रीडांगणावर बारामती विभागाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सुरेंद्र निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हेमलता तावरे उपस्थित होत्या.

शाळेमध्ये स्वागतगीत, समूहगीत गायन, देशभक्ती गीतांवर सामूहिक नृत्य, सायबरविषयक जागृती निर्माण करणारे डिजिटल योद्धा’ नाटक अशा विविध कार्यक्रमांनी देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध समाजसुधारक, क्रांतिकारक यांची वेशभूषा परिधान केली होती.

दहावीमध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

शाळेचे प्राचार्य तुषार कुलकर्णी यांनी शाळेमध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासपूर्वक उपक्रमांची माहिती देऊन, सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थी प्रतिनिधी विधिशा बांदल हिने आपल्या मनोगतातून राष्ट्रीय उत्कृष्टतेसाठी तरुणांनी विविध आव्हानांना संधीच्या रूपात पाहावे असे सांगितले

समन्वयक माधुरी क्षीरसागर, बालाजी घोळवे, वसुधा राऊत, सांस्कृतिक विभाग प्रमुख अबोली खोचे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सरिता परकाळे व शालेय प्रशासकीय प्रमुख शेखर तुपे यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थी अमृता बनसोडे, शौर्य अग्रवाल व सहशिक्षका शिल्पा जगताप, शुभांगी लोखंडे यांनी केले तर आभार निशा नालंदे यांनी मानले.

Related Articles

Back to top button