पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालददनी विद्यार्थ्यांचा जल्लोष
शाळे चेप्राचायातुषार कु लकर्णी यांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालददनी विद्यार्थ्यांचा जल्लोष
शाळे चेप्राचायातुषार कु लकर्णी यांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक उपक्रमाने बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दररोजचा परिपाठ घेतला. बालदिनी शाळेत विविध खेळ, वैयक्तीक गीतगायन, सामूहिक नृत्य, समूहगीत गायन स्पर्धा इ. सांस्कृतिक उपक्रम घेण्यात आले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या विविध मनोरंजनात्मक खेळ, जंपिंग जॅक यामध्ये मनसोक्त आनंद लुटला. यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोहार व भेटवस्तू देण्यात आल्या.
शाळेचे प्राचार्य तुषार कुलकर्णी यांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी समन्वयक माधुरी क्षीरसागर, वसुधा राऊत, सुप्रिया देवकाते, सांस्कृतिक विभाग प्रमुख अबोली खोचे, शालेय प्रशासकीय प्रमुख शेखर तुपे उपस्थित होते.






