पोदार प्रेपच्या चिमुकल्यांचा आजी-आजोबांसमवेत स्वातंत्र्य दिन साजरा
चिमुकल्यांनी आजी-आजोबांच्या मदतीने प्रेमाने बनवलेल्या स्वादिष्ट पाककृतीचा आस्वाद घेतला.

पोदार प्रेपच्या चिमुकल्यांचा आजी-आजोबांसमवेत स्वातंत्र्य दिन साजरा
चिमुकल्यांनी आजी-आजोबांच्या मदतीने प्रेमाने बनवलेल्या स्वादिष्ट पाककृतीचा आस्वाद घेतला.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील पोदार प्रेपच्या चिमुकल्यांनी देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन आजी-आजोबांसमवेत विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा केला.
स्वातंत्र्य दिन आणि मास्टरशेफचे संयोजन हे कुटुंबांना संस्कृती, परंपरा आणि देशभक्ती वर्तमानापासून भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व ओळखण्यास मदत करण्याच्या उद्देशाने पोदार प्रेपच्या चिमुकल्यांनी आजचा स्वातंत्र्य दिन आजी-आजोबांसमवेत विविध पाककृती व विविध उपक्रमाने साजरा केला.
यावेळी चिमुकल्यांनी आजी-आजोबांच्या मदतीने प्रेमाने बनवलेल्या स्वादिष्ट पाककृतीचा आस्वाद घेतला.
मुलांनी पालकांसोबत राष्ट्रीय चिन्हे कोडे खेळ, देशभक्तीपर गाणी – संगीत, ओरिगामी कलात्मकता, फॅब्रिक एक्सप्लोरेशन, भारतीय वारसा खेळ- स्मृती खेळ, त्रि-रंगी बॉल सॉर्टिंग अशा विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. शाळेचे प्राचार्य तुषार कुलकर्णी ह्यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सरिता परकाळे आणि सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.