पोदार स्कूलमधील विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रदर्शनातील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांची पालकांनी विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली.
पोदार स्कूलमधील विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रदर्शनातील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांची पालकांनी विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली.
बारामती वार्तापत्र
दि. २४ डिसेंबर रोजी बारामतीतील बांदलवाडी येथील नामंकित पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये रसायनशास्त्र , पदार्थ विज्ञान शास्त्र , जीवशास्त्राशी संबंधित अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळाली.
माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी जलशुद्धीकरण यंत्र , मानवी ह्रदयाची प्रतिकृती , रस्त्यावरील स्मार्ट पथदिवे , डायलिसिस यंत्राची प्रतिकृती , होलोग्राम प्रोजेक्टर , जलविद्युत निर्मिती प्रकल्प , थ्रीडी ॲनाग्लिफ व्हिडीओ , फ्लोअर क्लिनर रोबोट , ऊर्जाबचत ,पवनचक्की इत्यादी विविध प्रकल्पांची प्रतिकृती तयार करून प्रदर्शनात ठेवली होती.
शाळेचे प्राचार्य तुषार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान विभाग शिक्षकांनी या प्रदर्शनाचे नियोजन केले होते.
प्रदर्शनातील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांची पालकांनी विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकल्पांमधून मुलांमधील सुप्तगुण व सर्जनशीलता पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी समन्वयक माधुरी क्षीरसागर ,तुषार चव्हाण , मंगेश महामुनी , सोनाली काळे , शालेय प्रशासकीय प्रमुख शेखर तुपे त्यांचे सहकार्य लाभले.