क्राईम रिपोर्ट

पोलिसांचा धाक संपला!;शाळा सुटली अन डोकी फुटली.. बारामतीच्या पेन्सिल चौकातील धक्कादायक घटना 

पोलिसांचा धाक संपला!;शाळा सुटली अन डोकी फुटली.. बारामतीच्या पेन्सिल चौकातील धक्कादायक घटना 

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका पोलीस ठाण्याजवळच असलेल्या विद्या कॉर्नर चौकात अकरावीतील विद्यार्थ्यांची तुंबळ हाणामारी झाली. गर्दीने गजबजलेल्या चौकात हा प्रकार अनेकांनी पाहिला. काही लोकांनी त्याचा व्हिडीओ करत समाज माध्यमांवर व्हायरल केला.

त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलांच्या आई-वडिलांना पाचारण करत समज दिली.

विद्या कॉर्नर चौकात काही विद्यार्थी सिनेस्टाईल हाणामारी करत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. शिवाय बाजूला अनेक लोक हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

परंतु, त्यापैकी कोणीही ही भांडणे थांबविण्याचा प्रयत्न केलेला नाही. समाज माध्यमावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बारामतीत त्याची मोठी चर्चा झाली. पोलिसांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांना हा व्हिडीओ दाखवत त्या मुलांची नावे निष्पन्न केली.

किरकोळ कारणावरून या विद्यार्थ्यांमध्ये ही हाणामारी झाल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला बाचाबाची सुरू होती. त्यानंतर त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. एका विद्यार्थ्याने दुसर्‍याला बेदम मारहाण केली. मोठा दगड त्याच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यासंबंधी तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षक वैशाली पाटील यांनी सांगितले की, काही विद्यार्थ्यांची भांडणे सुरू होती. तेथे पोलीस तत्काळ पोहचले.

भांडणातील एक जण तेथे मिळून आला. त्याला पोलीस ठाण्यात आणत समुपदेशन करून संपूर्ण माहिती घेण्यात आली. त्यांच्यात वैयक्तिक कारणावरून भांडण सुरू असल्याचे समजले. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षकांच्या मदतीने अन्य मुलांची ओळख पटविण्यात आली. त्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात येणार आहे.

घटनेनंतर पोलिसांना जाग

या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या तालुका पोलिसांनी गुरुवारी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाबाहेर विनाकारण फिरणार्‍या तरुणांवर कारवाई केली. महाविद्यालयाच्या परिसरात फिरणार्‍यांवर यापुढे कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांचा धाक संपला

शहरात महाविद्यालयीन युवकाच्या खुनाची घटना ताजी असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यालगत हा प्रकार घडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram