पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले
पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले
मुंबईः बारामतीी वार्तापत्र रिपोर्ट
बेरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. यावेळी पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. यात पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० जागांसाठी भरती होणार आहे तर उर्वरित जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती होणार आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसंच, १२ हजार ५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी ५ हजार पदे भरण्याबाबत विचार करण्यात येईल, असा विश्वासही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात पोलिसांची संख्या कमी आहे. त्यातच करोनामुळे पोलिसांवर कामाचा अधिकचा ताण आला आहे. शिवाय अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली असून अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सुद्धा पोलीस भरती करण्यात येत असल्याचं बोललं जातं आहे.