“प्रकल्प संरचना विकासाची अंतर्दृष्टी: यशस्वी करिअरसाठी पद्धतशीर दृष्टीकोन” व्ही.एस. सॉफ्टवेअर लॅब, बारामती आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम
आगळ्या-वेगळ्या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना थेट उद्योगातील वास्तववादी दृष्टिकोनातून शिकण्याची संधी मिळाली.

“प्रकल्प संरचना विकासाची अंतर्दृष्टी: यशस्वी करिअरसाठी पद्धतशीर दृष्टीकोन” व्ही.एस. सॉफ्टवेअर लॅब, बारामती आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम
आगळ्या-वेगळ्या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना थेट उद्योगातील वास्तववादी दृष्टिकोनातून शिकण्याची संधी मिळाली.
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या बीबीए (सीए) विभागाने व्ही.एस. सॉफ्टवेअर लॅब, बारामती यांच्या सहकार्याने “प्रकल्प संरचना विकासाची अंतर्दृष्टी: यशस्वी करिअरसाठी पद्धतशीर दृष्टीकोन” या विषयावर एक दिवसीय सेमिनार आयोजित केला. या उपक्रमांतर्गत अंतिम वर्षातील बीबीए (सीए), एमसीए व एम.एस्सी. (सीएस) शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रोजेक्ट स्ट्रक्चर आणि सिस्टेमॅटिक डेव्हलपमेंट प्रक्रियेची सखोल माहिती देण्यात आली.
या सेमिनारमध्ये व्ही.एस. सॉफ्टवेअर लॅब, बारामती मधील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी (इंटर्न्स) स्वतः मार्गदर्शन करण्याचा अभिनव प्रयोग केला. प्रेरणा लंबाटे बीबीए (सीए), मोहसिना शेख (एमसीए), ऐश्वर्या माने (एमसीए), दिनाज शिकीलकर (एमसीए), निकिता नाळे (एमसीए), सिद्धिका भोरे (एमसीएस), शौनक डांके (एमसीए), प्रतीक साळुंखे (एमसीए), सौरभ शहाणे (एमसीए) आणि साहिल फडतरे (एमसीए) यांनी आपल्या इंटर्नशिपच्या अनुभवातून प्रोजेक्ट स्ट्रक्चर, मॉड्यूल डिझाइन, डेव्हलपमेंट स्टॅक्स, इंडस्ट्रीच्या अपेक्षा आणि करिअर याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या आगळ्या-वेगळ्या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना थेट उद्योगातील वास्तववादी दृष्टिकोनातून शिकण्याची संधी मिळाली. हा उपक्रम केवळ तांत्रिक ज्ञानच नाही तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, टीमवर्क, आणि इंडस्ट्री-रेडी स्किल्स यांचा अनुभव देणारा ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप, उपप्राचार्य प्रा.डॉ.अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा.डॉ.सचिन गाडेकर, बीबीए (सीए) विभाग प्रमुख प्रा.माधुरी सस्ते, व्ही.एस. सॉफ्टवेअर लॅबचे सचिव सचिन आटोळे यांचे मार्गदर्शन लाभले. सेमिनारचे समन्वयन आणि सूत्रसंचालन सलमा शेख यांनी केले. तसेच रेश्मा बाबर, अश्विनी भोसले, दत्तात्रय आर्डे, डॉ. शशिकांत नकाते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार तृप्ती भोसले यांनी मानले.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आयटी क्षेत्रातील भविष्यासाठी मार्गदर्शक ठरली असून, उद्योग आणि शिक्षण यामधील नव्या प्रयोगांची नांदी ठरली.