प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय येथे महाशिवरात्री साजरी
मनुष्य सृष्टीला पतित पासून पावन बनवण्याचे कार्य हे परमात्मा शिव करतात

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय येथे महाशिवरात्री साजरी
मनुष्य सृष्टीला पतित पासून पावन बनवण्याचे कार्य हे परमात्मा शिव करतात
बारामती वार्तापत्र
सायली हिल येथे बुधवार दि २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रि निमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्वरीय विश्व विद्यालय च्या वतीने ८९ वी शिवरात्रि साजरी करण्यात आली.
या वेळी ब्रह्माकुमारी शिवालय बारामती च्या संचालिका चंद्रलेखा दीदी व सागर भाई व इतर सेवक यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले.
निराकार परमात्मा शिव यांचा अध्यात्मिक परिचय गीता ज्ञान या द्वारे शिव यांचे अवतरण या कलियुगच्या अंताला गीतेत सांगितल्यप्रमाणे येऊन सम्पूर्ण मनुष्य सृष्टीला पतित पासून पावन बनवण्याचे कार्य हे परमात्मा शिव करतात तसेच शिवरात्रीचे अध्यात्मिक खरे रहस्य आपल्या मनुष्य सृष्टीला देण्याचे महान कार्य स्वत शिवपरमात्मा जो सम्पूर्ण सृष्टीचा रचयिता आहे तो मनुष्य सृष्टीचा तसेच सम्पूर्ण विश्वचा पालनकर्ता पिता ज्याला समूर्ण विश्व गॉड, अल्ला, ईश्वर, भगवान परमात्मा या नावाने पुकारतात तसेच त्याला त्रिमूर्ति शिव म्हटले जाते कारण ब्रह्मा विष्णु शंकर या द्वारे सृष्टीची स्थापना पालना आणी अधर्म चा विनाश हे महत्वचे कार्य स्वता ईश्वर येऊन हा परिचय ब्रह्माकुमारिस विद्यालय द्वारे देतात म्हणून या विद्यालयस् इश्वरीय विद्यालय म्हणतात असेही चंद्रलेखा दीदी व सागर भाई यांनी सांगितले.
यावेळी ध्वजरोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला . ब्रह्मकुमार ब्रह्माकुया विद्यालय द्वारे अनेकाना तनावमुक्ति, व्यसन्मुक्ति, अनेक मानसिक चिंतनातून, मुक्त होण्यासाठी राजयोग मेडिटेशन कोर्स विनमूल्य येथे केला जात आहे त्याचा लाभ घेण्याचे आवाहन सायली सेंटर च्या वतीने करण्यात आले.