राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तोंडातील अल्सरही काढून टाकण्यात आला आहे ; नवाब मलिक यांचं ट्विट
पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तोंडातील अल्सरही काढून टाकण्यात आला आहे ; नवाब मलिक यांचं ट्विट
पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते
मुंबई: बारामती वार्तापत्र रिपोर्ट
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तोंडातील अल्सरही काढून टाकण्यात आला आहे. त्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
शऱद पवार यांना नेमका कोणता त्रास होता ?
दरम्यान 30 मार्च रोजी संध्याकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. तत्पूर्वी 30 मार्च रोजी दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर पवारांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सध्या शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती.
सर्व कार्यक्रम रद्द
पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. पवार पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
नवाब मलिक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे रुटीन चेकअप आणि फॉलोअपसाठी पवार ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना तोंडाचा अल्सर असल्याचं आढळून आल्याने हा अल्सर काढून टाकण्यात आला आहे. सध्या शरद पवार हे रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे. तसेच पवार साहेब रोज कोरोना संसर्गाचा आढावा घेत आहेत. ते लवकरच बरे होऊन आपल्या दैनंदिन कार्यास सुरुवात करतील, असंही मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.