स्थानिक

प्रजासत्ताक दिनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

शहरातील मान्यवर, पत्रकार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

शहरातील मान्यवर, पत्रकार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामती वार्तापत्र 

प्रजासत्ताक दिनाच्या 71 वा वर्धापनदिन बारामती येथे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम येथील रेल्वे मैदानावर पार पडला.

प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त येथील रेल्वे मैदानावर श्री. कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या संचलन पथकाचे निरीक्षण केले. पथकात शहर पोलीस पथक, अग्निशमन दल, यांचा समावेश होता. यानंतर सर्व पथकांनी संचालनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

मानवंदनेच्या कार्यक्रमानंतर बारामती कोरोना योध्‍दा सत्‍कार समारंभ करण्‍यात आला. त्‍यामध्‍ये वैद्यकीय अधिक्षक सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल डॉ. सदानंद काळे, रूई ग्रामीण रूग्‍णालय बारामतीचे डॉ. दराडे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे , बारामती नगरपरिषदीचे कर्मचारी राजेश लोहाट ,सलीम शेख , हर्षल इंगुले , योगेश खंडाळे आदीचा समावेश होता.

यावेळी तालुक्यातील स्वातंत्रय सैनिक, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती श्रीमती निता बारवकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, तहसिलदार विजय पाटील , नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, निवासी नायब तहसलिदार धनंजय जाधव , सा.बां.वि. उपअभियंता विश्‍वास ओहोळ, गटविकास अधिकारी राहूल काळभोर , पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे , नगरसेवक सचिन सातव, जि. प. माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर तसेच विविध विभागाचे शासकीय अधिकारी, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्ताराधिकारी, शहरातील मान्यवर, पत्रकार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी प्रशासकीय इमारत येथे मा. तहसिलदार विजय पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

Related Articles

Back to top button