प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे
दौऱ्याच्या अनुषंगाने केली पाहणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे
दौऱ्याच्या अनुषंगाने केली पाहणी
इंदापूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाकरीता देहू येथे १४ जून रोजी येणार असून त्या अनुषंगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी देहू येथे जाऊन बुधवारी (दि.१) पाहणी केली तसेच नियोजन बैठक घेतली.
यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे ,श्री. संत तुकाराम महाराज संस्थेचे विश्वस्त व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी हा ऐतिहासिक क्षण असून देशाचे लोकप्रिय व कणखर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देहू येथे पहिल्यांदाच येत आहेत.त्यानिमित्ताने नियोजन पाहणी केली असून प्रधानमंत्र्यांच्या दौर्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.