स्थानिक

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा-उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी

निरावागज येथे हरभरा पिकाबाबत आयोजित 'महिला शेतीशाळा'

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा-उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी

निरावागज येथे हरभरा पिकाबाबत आयोजित ‘महिला शेतीशाळा’

बारामती वार्तापत्र

महिला शेतकऱ्यांनी स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून लघू कृषीपूरक व्यवसाय उभारावेत, याकरीता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी यांनी केले.

निरावागज येथे हरभरा पिकाबाबत आयोजित ‘महिला शेतीशाळा’ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, मंडळ कृषी अधिकारी सुभाष बोराटे, कृषी पर्यवेक्षक संतोष पिसे, प्रतापसिंह शिंदे, कृषी सहायक ज्योती गाढवे यांच्याह शेतकरी उपस्थित होते.

श्री. शिंदे यांनी हरभरा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन तसेच सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन केले. हरभरा पीक क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देवून सापळे (ट्रॅप), पक्षी थांबे, चिकट सापळे, सापळा पिके, आंतरपिके याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी श्री. चौधरी यांनी शेतकरी कविता भोसले यांना महाडिबीटी पोर्टलअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतून मिळालेल्या ‘रोटावेटर’ या औजाराचा त्या कसा लाभ घेत असल्याची माहिती जाणून घेतली.

मंडळ कृषी अधिकारी श्री. बोराटे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले.

या शेती शाळेसाठी निरावागज येथील जिजामाता महिला शेतकरी गट, अहिल्या महिला शेतकरी बचत गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button