प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांचा वाढता जनाधार
मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण उमेदवार गणेश पाटील व वंदना शिंदे पोहचले घरोघरी

प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांचा वाढता जनाधार
मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण उमेदवार गणेश पाटील व वंदना शिंदे पोहचले घरोघरी
इंदापूर –
इंदापूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये नगरपरिषद निवडणुकीची चुरस वाढत असतानाच, उच्चशिक्षित आणि विकासाभिमुख पुरुष उमेदवार म्हणून – गणेश मेघश्याम पाटील व कर्तुत्ववान महिला उमेदवार वंदना भारत शिंदे यांना मतदारांचा – प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यांनी – दाखल केलेल्या उमेदवारी अर्जानंतर प्रभागात निर्माण झालेल्या उत्साहवर्धक वातावरणामुळे त्यांचा जनाधार वेगाने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
कृषी,उद्योग, बचत गट,सामाजिक समतोल,प्रगतशील शेतकरी, व्यवसायाशी निगडित पाटील व शिंदे परिवाराची ओळख प्रभागात सर्वत्र आहे. सामाजिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक स्तरांतून या कुटुंबाचे नागरिकांशी स्नेहाचे संबंध असल्याने पाटील व शिंदे यांच्याबाबत मतदारांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. शांत, संयमी, सकारात्मक विचारसरणी आणि सामाजिक जाणिवा हे त्यांचे ठळक गुण असल्यामुळे प्रभागातील महिलांसह युवक व ज्येष्ठ नागरिक त्यांना चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत.

व्यवसायासोबत समाजकार्यात अधिक सक्रिय भूमिका निभावण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. डेव्हलपमेंट हा माझा मूलभूत स्वभाव असून, प्रभागातील प्रत्येक घटकाचा शाश्वत विकास करण्याचे स्पष्ट व्हिजन माझ्याकडे आहे. असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, महिला सबलीकरण आणि युवकांना संधी निर्माण करण्याचे अनेक मुद्दे त्यांनी आपल्या प्रचारामध्ये अधोरेखित केले आहेत.
इंदापूर नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांच्या हस्ते हा शुभारंभ होताच, प्रभागातील वातावरणाला रंगत आली. या कार्यक्रमाला शेकडो महिला आणि पुरुष उपस्थित होते. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच गणेश पाटील व वंदना शिंदे यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचा आशीर्वादही घेतला. एवढ्या कमी वेळात प्रभागातील दारोदार पोहोचणारे ते दोन्ही पहिले उमेदवार ठरले आहेत.

प्रामाणिक, हुशार, सर्वांशी नम्रतेने वागणारे दोन्ही उमेदवार म्हणून त्यांची ओळख आधीपासूनच ठळक आहे. गणेश पाटील व वंदना शिंदे हे दोन्ही उमेदवार या प्रभागासाठी योग्य आणि सक्षम उमेदवार असून, मतदार निश्चितच त्यांना मतदानरूप आशीर्वाद देतील, असा विश्वास यावेळी भरत शहा यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक तीनमध्ये त्यांचा प्रचार वेग पकडत असून, मतदारांमध्ये सकारात्मकता, विश्वास आणि बदलाची नवी उमेद निर्माण झाली आहे. गणेश पाटील व वंदना शिंदे यांच्या प्रवेशाने निवडणुकीची लढत आणखी उत्सुकता निर्माण करणारी ठरली आहे.






