प्रभाग क्रमांक तीनमध्ये शेखर पाटील व मनिषा शिंदे यांच्या प्रचाराला उस्फुर्त प्रतिसाद
सर्वच मतदारांचा भरभरून प्रतिसाद

प्रभाग क्रमांक तीनमध्ये शेखर पाटील व मनिषा शिंदे यांच्या प्रचाराला उस्फुर्त प्रतिसाद
सर्वच मतदारांचा भरभरून प्रतिसाद
इंदापूर –
इंदापूर शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील अपक्ष तरुण, उत्साही आणि विकासाभिमुख उमेदवार शेखर अशोकराव पाटील व कर्तुत्ववान महिला उमेदवार मनिषा पांडुरंग शिंदे यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे.सुरुवातीपासूनच प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला सकारात्मक प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. शुभारंभानंतर शेखर पाटील व मनिषा शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह प्रभागातील घराघरात भेट देत जनसंपर्क मोहीम गतिमान केली. अनेक ठिकाणी मतदारांनी त्यांचे स्वागत करत समस्यांची माहिती दिली. युवक वर्गाकडून मिळणारा उत्तम प्रतिसाद त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला अधिक बळकटी देत आहे, तर जेष्ठ नागरिक त्यांना आशीर्वाद देत त्यांची उमेदवारी योग्य असल्याचे मत नोंदवत आहेत.
युवा उद्योजक म्हणून ओळख असलेल्या शेखर पाटील व मनिषा शिंदे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट व्हिजन मांडले आहे. स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, सुरक्षित परिसर, युवकांसाठी सुविधा, महिलांसाठी उपक्रम या मुद्यांवर त्यांनी प्राधान्याने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रामाणिक स्वभावाची आणि लोकांशी असलेल्या संवादक्षम नात्याचीही चर्चा होत आहे.

बारामती वार्तापात्रशी बोलताना अपक्ष उमेदवार शेखर पाटील व मनिषा शिंदे म्हणाले की,आमच्याकडे प्रभाग विकासाचे प्रभावी व्हिजन आहे. आमच्या कामाची तळमळ जनतेला स्पष्टपणे दिसते. प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाचे नवे मार्ग निर्माण करण्यासाठी आम्ही एकजुटीने काम करू. नागरिकांनी काळजी करू नये, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत.प्रभागातील नागरिकांची सेवा करण्याची संधी मतदार नक्की देतील, असा मला विश्वास आहे. आदर्श आणि शाश्वत विकासाचे व्हिजन साकार करण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून त्यांच्या अपेक्षा आणि अडचणी जाणून घेणे हे आमचे प्राधान्य आहे. शेखर पाटील व मनिषा शिंदे यांच्या प्रचारात युवकांनीही उत्साहाने सहभाग घेतला असून त्यांच्या सक्रियतेमुळे प्रभागात निवडणूक चुरशीला अधिक रंग चढत आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये आता वातावरण आणखी तापत असून पुढील काही दिवसांत प्रचार मोहिमेचा वेग अधिक वाढेल, अशी चर्चा मतदारांमध्ये आहे.





