आपला जिल्हा

प्रभाग क्रमांक 3 मधून युवानेते गौरव प्रकाश राऊत इच्छुक 

मागील चार वर्षापासून सामाजिक सेवेत..

प्रभाग क्रमांक 3 मधून युवानेते गौरव प्रकाश राऊत इच्छुक 

मागील चार वर्षापासून सामाजिक सेवेत..

इंदापूर,आदित्य बोराटे –

इंदापूर नगर परिषदेचे आरक्षण जाहीर होताच शहरातील सामाजिक कार्यकर्ते,जनसेवक,लोकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या,युवकांनी नगरसेवक पदासाठी धावपळ सुरू केली आहे.यामध्ये लोकसेवा युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,युवा नेतृत्व गौरव प्रकाश राऊत यांनीही उडी घेतली आहे.शहरातली प्रभाग क्रमांक तीन मधून सर्वसाधारण जागेवर मी इच्छुक असल्याचे त्यांनी बारामती वार्तापत्र शी बोलताना सांगितले.

प्रभाग क्रमांक तीन मधील सावतामाळीनगर,नागझरी मळा,गणेशनगर,खंडोबा मंदिर परिसर,अंबिकानगर या प्रभाग क्रमांक तीन मधील भागामध्ये,उच्चशिक्षित तरुणांची संख्या अधिक आहे.आजही ते तरुण मोलमजुरी करत आहेत.हे अतिशय दुर्दैवी आहे.प्रभागामध्ये महिलांची संख्या ही अधिक आहे.बहुतांश महिला धुणीभांडी आणि मोलमजुरी करीत आहेत.त्यांना शाश्वत आर्थिक उत्पन्न नाही.तसेच त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी,स्थानिक समस्यांना न्याय देण्यासाठी,नगरसेवक पदासाठी मी इच्छुक आहे. असेही गौरव प्रकाश राऊत यांनी सांगितले.

लोकसेवा युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून, मागील चार वर्षापासून  रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, शेकडो लोकांची मोतीबिंदूची मोफत ऑपरेशन,आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमातून सामाजिक सेवेत आहे. सामाजिक सेवेची मला आवड आहे. परंतु ही सामाजिक सेवा करीत असताना,आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना,योग्य न्याय देण्यासाठी संविधानिक पद असणे आवश्यक आहे.त्यामुळे मी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे.त्या माध्यमातून समाजाची आणि समाजातील अन्यायग्रस्तांची मला सेवा करायची आहे.

2016- 17 पासून मी इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. त्यामुळे शहा परिवार माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचा विचार करून मला नक्कीच संधी देतील,असा मला पूर्ण विश्वास आहे.

Back to top button