प्रवीणभैय्या माने मित्र परिवाराच्या वतीने इंदापुरात नागपंचमी महोत्सवाचे आयोजन.
मोबाईलच्या अतिवापरामुळे आनंद हरवत चालला आहे.

प्रवीणभैय्या माने मित्र परिवाराच्या वतीने इंदापुरात नागपंचमी महोत्सवाचे आयोजन.
मोबाईलच्या अतिवापरामुळे आनंद हरवत चालला आहे.
इंदापूर: प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेचे मा.बांधकाम सभापती तसेच भाजपा नेते प्रवीणभैय्या माने मित्र परिवाराच्या वतीने गणेश देवकर यांनी मंगळवारी (दि.२९) इंदापुर शहरातील बाबा चौक, वडार गल्ली येथे नागपंचमी सणाच्या निमित्ताने “नागपंचमी मोहोत्सवाचे” आयोजन करण्यात आले होते. यावेळी महोत्सवात शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला.
यामध्ये महिलांसाठी उखाणे घेणे, तळ्यात मळ्यात, संगीत खुर्ची, ग्लास पाडणे, पायाला बांधून फुगे फोडणे अशा विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजप कार्यकर्ते गणेश देवकर यांनी बोलताना सांगितले की, मोबाईलच्या जमान्यात पारंपारिक खेळ लुप्त पावत चालले आहे.
मोबाईलच्या अतिवापरामुळे आनंद हरवत चालला आहे. या धकाधकीच्या जीवनात महिलांमधील ताणतणाव दूर होऊन नवी ऊर्जा व उत्साह निर्माण व्हावा या हेतूने नागपंचमी मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महोत्सवात सहभागी विजेत्या स्पर्धक स्मिता प्रवीण चौगुले, रेणुका नवनाथ पवार, सपना अजय पवार, सुभद्रा गंगाराम पवार यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी, मिक्सर, नेकलेस सेट, विठ्ठल मूर्ती आदी बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेश देवकर, गौरव भारत चौगुले, रोहित दत्तात्रेय पवार, निखिल साधू चौगुले, सुरज तानाजी चव्हाण, तानाजी धोंडीबा देवकर, मयूर मोहन शिंदे, सुनील महादेव देवकर, पिनू मखरे यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक संतोष नरुटे (नरुटवाडी ता. इंदापूर) यांनी केले.