प्रवीण माने यांच्या गोलंदाजीवर प्रदीप दादांची अफलातून फटकेबाजी
कै. अजित फाउंडेशनच्या वतीने इंदापूरमध्ये भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
प्रवीण माने यांच्या गोलंदाजीवर प्रदीप दादांची अफलातून फटकेबाजी
कै. अजित फाउंडेशनच्या वतीने इंदापूरमध्ये भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
इंदापूर : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचा खेळ म्हणजे क्रिकेट असून, यामध्ये अचूक वेळ साधली तर तुम्हांला आयुष्याचा वेध घेता येतो तसेच क्रिकेट स्पर्धेमधून संघटना कौशल्याचा विकास होतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी केले.
इंदापूर शहरातील शंभर फुटी रोड येथील नगरपालिका मैदान येथे कै. अजित फाउंडेशन व श्रीनाथ क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या क्रिकेट सामन्यांचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती तथा सदस्य प्रविण माने, कै. अजित फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक अनिकेत वाघ, स्वप्नील राऊत, गजानन गवळी, दादासाहेब सोनावणे व सामजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने म्हणाले की, खेळाचे महत्व कमी होत चालले असून, खेळ म्हणजे जीवन आहे. त्यामुळे तरुणांनी खेळाला प्रथम प्रधान्य देवून जीवन जगले पाहिजे.
यावेळी प्रवीण माने यांनी गोलंदाजी केली तर तुफान फटकेबाजी करत प्रदीप गारटकर यांनी फलंदाजी केली यावेळी बाळासाहेब ढवळे व नगरसेवक यांनी क्षेत्ररक्षण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब ढवळे यांनी केले तर सूत्रसंचालन ऍड. आशुतोष भोसले यांनी केले तर आभार राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक मारुती मारकड यांनी मानले.