प्रशासकीय भवनात एंटीजन तपासणी कॅम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद
182 इतक्या अँन्टीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैंकी 180 टेस्ट निगेटिव्ह तर 02 टेस्ट पॉझिटिव्ह
प्रशासकीय भवनात एंटीजन तपासणी कॅम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद
182 इतक्या अँन्टीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैंकी 180 टेस्ट निगेटिव्ह तर 02 टेस्ट पॉझिटिव्ह
बारामती वार्तापत्र
बारामती शहरासह ग्रामीण भागातील कोरोना रूग्ण शोधण्यासाठी पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत धडक मोहिम राबविण्यात येत आहे. आज प्रशासकीय भवनात एंटीजन टेस्ट कँम्पचे आयोजन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले . या अँन्टीजन कॅम्पला बहुसंख्य नागरिकांनी आणि प्रशासकीय भवनातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा सहभाग नोंदवून अँन्टीजन टेस्ट करून घेतल्या. या कँम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कँम्पमध्ये आज 182 इतक्या अँन्टीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैंकी 180 टेस्ट निगेटिव्ह तर 02 टेस्ट पॉझिटिव्ह आल्या.
या कँम्पमध्ये आरोग्य विभाग, पंचायत समिती , बारामती येथील डॉ. एस.एस.उपाध्ये, डॉ. ज्योती रणदिवे, डॉ. निकिता घुले, लॅब टेक्नीशियन स्वप्निल खोमणे, शुभम सौंदर, परिचारका प्रज्ञा जगदाळे व कविता पवार आदी उपस्थित होते.