स्थानिक

सोशल पेरेंटींग ही काळाची गरज – शिवाजी निंबाळकर

कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांच्या विचाराने काम करू

सोशल पेरेंटींग ही काळाची गरज – शिवाजी निंबाळकर

कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांच्या विचाराने काम करू

बारामती वार्तापत्र

विद्यार्थ्यांना गुन्हेगारी आणि व्यसनापासून लांब ठेवून शिक्षणाच्या मार्गावर ठेवण्यासाठी सोशल पेरेंटींग मुव्हमेंटसारखा उपक्रम आज काळाची गरज असून या उपक्रमाचा पहिला सभासद होण्यास मी तयार आहे असे प्रतिपादन छत्रपती सहकारी साखर कारखान्याने नवनिर्वाचित संचालक शिवाजी निंबाळकर यांनी केले. संविधान विचार मंचातर्फे सोशल पेरेंटींग मुव्हमेंट या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत शिवाजी निंबाळकर यांच्यासह निलेश टिळेकर, सतीश देवकाते, बाळासाहेब कोळेकर यांचा छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच बारामती फलोत्पादक संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल रघुनाथ देवकाते पाटील यांचा संविधान विचार मंच आणि एकता शेतकरी समुहाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांच्या विचाराने काम करू असे यावेळी शिवाजी निंबाळकर यांनी सांगितले. मंचाचे सर्व उपक्रम समाजाला उपयोगी पडणारे असून एक कार्यकर्ता म्हणून यासोबत असल्याचे बाळासाहेब कोळेकर यांनी सांगितले.

बारामती शहरातील प्रशासन तसेच शैक्षणिक संस्था यांच्याशी समन्वय साधून सोशल पेरेंटीग मुव्हमेंटचा उपक्रम राबविला जाणार असून यासाठी सर्व पालकांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे यावेळी संविधान विचार मंचाचे अध्यक्ष राजेश कांबळे यांनी सांगितले.

एकता शेतकरी समुहाचे प्रशांत शेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान विचार मंचाचे सचीव घनश्याम केळकर यांनी केले तर समन्वयक मोहन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button