कोरोंना विशेष

बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायतीसह अन्य 11 गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 15 गावांमध्ये अलर्ट जारी 

दररोज सरासरी 300 ते 400 नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत.

बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायतीसह अन्य 11 गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 15 गावांमध्ये अलर्ट जारी

दररोज सरासरी 300 ते 400 नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत.

बारामती वार्तापत्र

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. आधी शहरांमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाने आता गावखेड्यात धडक दिलीय. त्यामुळे तालुका आणि गाव पातळीवरील प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायतीसह अन्य 11 गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. तर 15 गावांमध्ये अलर्ट जारी केला गेलाय. बारामतीमध्ये मागील महिन्याभरात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळतोय. दररोज सरासरी 300 ते 400 नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून रुग्णसंख्येवर आधारीत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बारामती तालुक्यात मागील दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यानं सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी होतेय. बारामतीत आतापर्यंत 20 हजार 431 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

बारामती नगर परिषदेतील हाय अलर्ट आणि अलर्टवर असणारी गावे –

हाय अलर्ट – बारामती नगर परिषद, माळेगाव नगर पंचायत, गुणवडी, मुढाळे, झारगडवाडी, होळ, कटफळ, सोनगाव, लाटे, मुरुम, काऱ्हाटी, सावळ, शिर्सूफळ.

अलर्ट – काटेवाडी, निरावागज, पणदरे, वंजारवाडी, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बुद्रुक, डोरलेवाडी, पिंपळी, मळद, मेखळी, सांगवी, गोजुवाडी, खांडज, मोरगाव, कन्हेरी.

बारामतीतील लॉकडाऊनची नियमावली?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये 5 मे ते 11 मे दरम्यान लॉकडाऊन लागू आहे. यात दूध विक्रीसाठी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत मुभा असेल. तर मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा, भाजी मंडई या काळात बंद राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!