प्रा. दत्ता विश्वनाथ लोंढे यांना मानसशास्त्र विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान
"Certain Psychological Correlates with Suicidal Ideation among Students "
प्रा. दत्ता विश्वनाथ लोंढे यांना मानसशास्त्र विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान
“Certain Psychological Correlates with Suicidal Ideation among Students ”
बारामती वार्तापत्र
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील मानसशास्त्र विषयाचे शिक्षक प्रा. दत्ता विश्वनाथ लोंढे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर ) यांच्याकडून आज पीएच.डी पदवी प्रदान केली.
त्यांनी “Certain Psychological Correlates with Suicidal Ideation among Students ”
या विषयावर शोध प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखे अंतर्गत मानसशास्त्र विषयात प्रा.दत्ता लोंढे यांना अंतर्गत परीक्षक प्राचार्य डॉ. सी. पी. लभाणे, बहि:स्थ परीक्षक डॉ. बूणकर सर,मूल्यमापन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. अपर्णा अष्टपुत्रे (विभाग प्रमुख, मानसशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या हस्ते पीएच. डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान केली.
मार्गदर्शक म्हणून आर्ट्स, सायन्स कॉलेज, चिंचोली, छत्रपती संभाजीनगर, महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.डॉ. उमाकांत सुभाष गायकवाड यांनी काम पाहिले.
या पदवी बद्दल – यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. जवाहर शेठ वाघोलीकर, सचिव श्री. मिलिंद भाई शहा, रजिस्टार श्री. अभिनंदन शहा यांनी अभिनंदन केले. प्राचार्य, डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ. अशोक काळंगे, डॉ.सचिन गाडेकर , डॉ. योगिनी मुळ्ये, मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विजयकुमार बलभीम शिंदे, प्रा. डॉ. गणेश ढमे, प्रा. डॉ. ज्योतीराम आवटे , श्री.अप्पा जमदाडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला.
प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, ग्रंथालय कर्मचारी, सर्व विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.