प्रेम आंधळ असतं पण ते किती
एकमेकांच्या फोनवर फोन येऊ लागले आणि परत पहिल्यासारखे प्रेम प्रकरण सुरू आहे
प्रेम आंधळ असतं पण ते किती
एकमेकांच्या फोनवर फोन येऊ लागले आणि परत पहिल्यासारखे प्रेम प्रकरण सुरू आहे
बारामती वार्तापत्र
आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा असं दृश्य पाहिलं असेल कि प्रेमी युगुलाला एकमेकांपासून दूर केले मात्र तरीही शेवटी ते एकत्र येतात.आणि त्यांचाच विजय होतो. मात्र प्रत्यक्षात असा किस्सा घडला आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन व त्यांच्या घराशेजारी असणारी एक अल्पवयीन मुलगी या दोघांचं कमी वयातच प्रेम प्रकरण सुरू झालं शेवटी दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र पळून जाताना हे प्रेमी युगुल घरच्यांना सापडले आणि मग त्यांची ताटातूट झाली आणि त्या अल्पवयीन मुलीचं दुसऱ्या का मुलाबरोबर लग्न लावून दिले. पण म्हणतात ना प्रेम आंधळ असतं चार वर्षानंतर ते पुन्हा भेटले मग एकमेकांच्या फोनवर फोन येऊ लागले आणि परत पहिल्यासारखे प्रेम प्रकरण सुरू आहे. मुलगी तीच्या वाढदिवसा दिवशी दोघांनीही पळून जायचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ते बारामतीत आले आणि बारामतीत येऊन स्त्री आधार केंद्रातील अंजलीताई वाघमारे यांच्याकडून त्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी मुलीचे वडील ,नवरा यांना बोलावले पण प्रेमापुढे मुलीने आई-वडिलांसोबत व नवऱ्यासोबत जाण्यास नकार दिला व प्रियकारा सोबतच मी राहणार आहे असा ठाम निर्धार व्यक्त केला मग सर्व वरात बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पीआय. नामदेवराव शिंदे यांच्यासमोर आले व मुलीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तिला स्वातंत्र्य असल्याचे सांगितले व पुन्हा हे प्रेमी जोडपे चार वर्षानंतर एकत्र आले.