बारामतीच्या विकासावर प्रश्नचिन्ह! स्प्रिंग व्हिलेज रहिवाशांचा संताप
तब्बल २५० ते ३०० फ्लॅट आहेत.

बारामतीच्या विकासावर प्रश्नचिन्ह! स्प्रिंग व्हिलेज रहिवाशांचा संताप
तब्बल २५० ते ३०० फ्लॅट आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात विकासकामांना मोठ्या प्रमाणावर गती मिळत असताना काही भाग मात्र विकासापासून वंचित राहिले आहेत. तांदुळवाडी परिसरातील पानसरे इन्फाटेक स्प्रिंग व्हिलेज या सोसायटीतील नागरिकांनी या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्प्रिंग व्हिलेजमध्ये तब्बल २५० ते ३०० फ्लॅट असून येथे राहणाऱ्या नागरिकांचा आरोप आहे की बारामतीचा विकास फक्त कागदावर दिसतो, प्रत्यक्षात त्यांच्या परिसरात काहीच होत नाही. बारामतीच्या चारी बाजूंनी रिंग रोडचे काम जोरात सुरू असले तरी तांदुळवाडी वेस्ट रोड परिसरातील विकासकामे मात्र थांबलेली आहेत.
नागरिकांनी अनेक वेळा लेखी अर्ज, तसेच व्हिडिओद्वारेही नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे“बारामतीचा विकास आमच्या भागापर्यंत कधी पोहोचणार? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
यामुळे बारामतीच्या समतोल विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.