कृषी

फार्मर कप” करिता क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम बारामती येथे संपन्न

“फार्मर कप” स्पर्धेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन

फार्मर कप” करिता क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम बारामती येथे संपन्न

“फार्मर कप” स्पर्धेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन

बारामती वार्तापत्र

कृषी विभाग आत्मा पुणे व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “फार्मर कप” क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम कन्हेरी फळ रोपवाटिका, बारामती येथे बारामती व इंदापूर तालुक्यांसाठी एकत्रितपणे बुधवारी (दि.12) आयोजित करण्यात आला. पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक सुखदेव भोसले यांनी “फार्मर कप” स्पर्धेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी बारामती टी. के. चौधरी, तालुका कृषी अधिकारी बारामती सचिन हाके,इंदापूरचे तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी रश्मी जोशी व कृषी अधिकारी राजेंद्र डोंबाळे, पाणी फाउंडेशनचे पृथ्वीराज लाड, मयूर साळुंखे, अपूर्वा भारमल आणि मानसी बर्गे उपस्थित होते.

यावेळी बारामती व इंदापूर तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, तंत्रज्ञान व्यवस्थापक, उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button