फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक ;आरोग्यमंत्री राजेश टोपे!
कोरोनाची तिसरी लाट मार्चपर्यंत संपणार, ICMR चा दावा
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक ;आरोग्यमंत्री राजेश टोपे!
कोरोनाची तिसरी लाट मार्चपर्यंत संपणार, ICMR चा दावा
मुंबई, प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. जानेवारी महिन्यात जितकी संख्या वाढली होती, ती आता कमी झाली आहे.
राज्य सरकारने आधीच जानेवारी महिन्यात लागू केलेले निर्बंध हटवले आहे. पण आता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक केला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार, रेस्टॉरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याकडे कल राहिलं, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे यांनी चारदिवसांपूर्वीच राज्यात आता पुन्हा निर्बंध लावले जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती.’सरकार अतिरिक्त निर्बंध लादणार नाही. मात्र येत्या काही दिवसांत ते हळूहळू कमी करेल. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांवर चर्चा केली. दरम्यान काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले गेले आहेत आणि प्रकरणांची संख्या कमी झाल्यामुळे हळूहळू राज्यभरात आणखी शिथिल केली जाईल, असं टोपे म्हणाले होते.