फेरेरो इंडिया मध्ये कामगार व प्रशासन मध्ये एतेहसिक वेतन करार
सदर वेतन वाढीमुळे कामगार समाधानी

फेरेरो इंडिया मध्ये कामगार व प्रशासन मध्ये एतेहसिक वेतन करार
सदर वेतन वाढीमुळे कामगार समाधानी
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसी मधील फेरेरो इंडिया प्रायव्हेट लि व इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईज युनियन यांच्या मध्ये झालेला वेतनवाढ करार १ जुलै २०२० ते ३० जून २०२४ वर्षाकरिता वेतन करार करण्यात आला आहे.
चार वर्षांकरिता सर्व कामगारांना वेतनवाढ १५५०० रु + तसेच जादा ६७५/- रू हे जुलै २०२१ पासुन लागु होतील .एकुण = १६१७५/- रुपये ची वाढ होईल (प्रत्येक वर्षी सेवा ग्राह्य धरून वाढ असेल ) शिवाय महागाई भत्ता,बोनस,जादा काम,ग्रेड अपग्रेडेशन वाढ,रात्रपाळी भत्ता,वाहतूक भत्ता व पुरस्कार मध्ये गुणवंत कामगार, दीर्घ सेवा ,गुणवान पाल्य, राष्ट्रीय खेळ पुरस्कार देण्यात येणार असून खेळ,विवाह,निवडणूक साठी पगारी रजा दिली जाणार आहे तर प्रत्येक कामगारांच्या कुटूंबियाचा मेडिक्लेम पॉलिसी व कामगारांची टर्म पॉलिसी काढण्यात येणार आहे.
सदर करारावेळी संघटनेच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब डेरे, सचिव महेश काटे, उपाध्यक्ष महेश लकडे, कार्याध्यक्ष शैलेश बोरकर, खजिनदार शितल शेंडे सहसचिव संतोष गवळी, कार्यकारणी सदस्य दत्तात्रय गायकवाड, मनोज भोसले, सचिन पिंगळे सौ. अर्पणा रंधवे,फरजाना शेख , तसेच कंपनीच्या वतीने प्लँट हेड डॅनिएल पेरोटिनो, एच. आर. हेड उमेश दुगानी, सी एफ ओ कुंदन पटेल, कंट्री एच. आर. हेड फाबीओ , फायनान्स हेड प्रशांत पोतनीस, रिजन इंडिया रिवॉर्ड मॅनेजर जिमी गांधी, आय. आर. मॅनेजर रमेश हिरेमठ, वरिष्ठ कार्यकारी एच. आर. योगेश मगदूम यांनी सह्या केल्या.
सदर वेतन वाढीमुळे कामगार समाधानी असून कंपनी प्रशासन बरोबर नेहमी संघटना सहकार्य करील असा विश्वास कामगार संघटना अध्यक्ष बाळासाहेब डेरे यांनी दिला