‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये 500 जागांसाठी भरती,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती

'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये 500 जागांसाठी भरती,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती

‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये 500 जागांसाठी भरती,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती

अर्ज करण्यास सुरुवात : 5 फेब्रुवारी 2022

प्रतिनिधी

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. बँकेने जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.  जनरलिस्ट ऑफिसर Scale-II and Scale-III या श्रेणीसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमधील  जनरलिस्ट ऑफिसर Scale-II and Scale-III पदासाठी अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सर्व माहिती.

>> पदाचे नाव  : Generalist Officer ( Scale-II and Scale-III)

>> किती जागांसाठी भरती : 500 जागा

  • Generalist Officer (Scale-II): 400 पदे
  • Generalist Officer (Scale-III): 100 पदे

शैक्षणिक पात्रता:

> जनरलिस्ट ऑफिसर (Scale-II) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांने किमान 60 टक्क्यांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा किमान 45 टक्के असणार आहे. उमेदवाराला किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

> जनरलिस्ट ऑफिसर (Scale-III): अर्ज करणाऱ्या उमेदवारांने किमान 60 टक्क्यांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असावी. अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा किमान 45 टक्के असणार आहे. उमेदवाराला किमान 5 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

परीक्षा केंद्र :
लखनौ, पाटणा, रायपूर, दिल्ली एनसीआर, रांची, भोपाळ, चंदीगड, पणजी, अहमदाबाद, सुरत, गांधीनगर, बेंगळुरू, त्रिवेंद्रम, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, भुवनेश्वर, जयपूर, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता.

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल

>> महत्त्वाच्या तारखा : 

अर्ज करण्यास सुरुवात : 5 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022
परीक्षेची तारीख : 12 मार्च 2022
निकालाची तारीख : अद्याप जाहीर नाही

>> अर्ज शुल्क 

सामान्य/ओबीसी प्रवर्ग : 1180 रुपये
आर्थिकदृष्ट्या मागास : 1180 रुपये
अनुसूचित जाती/ जमाती : 118 रुपये
महिला/दिव्यांग : निशुल्क

इच्छुक उमेदवारांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरता येईल.

>> वयोमर्यादा: 

किमान वय: 25 वर्षे
कमाल वय: 35 वर्षे (स्केल-II)
कमाल वय: 38 वर्षे (स्केल-III)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram