बगावत का बद्दल;!बारामती मतदार संघातून अखेर चाचा Vs भतीजा देणार लढत
बगावत का बद्दल;!बारामती मतदार संघातून अखेर चाचा Vs भतीजा देणार लढत
शरद पवार गटाने जाहीर केली उमेदवारांची पाहिली यादी!
64 वर्षांनंतर पुन्हा पवार काका-पुतणे एकमेकांविरोधात उभे ठाकणार का
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आपली पहिली ४५ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, बारामती विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांना उमेदवारी देऊन, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नवा डाव मांडला आहे.
अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे, तर युगेंद्र हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. एकंदरीत या मतदारसंघात पुतण्यांचे आव्हान असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरवले होते. त्या निवडणुकीत सुनेत्रा यांचा पराभव झाला होता. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बारामती विधानसभा क्षेत्रात सुळे यांनी आघाडी घेतली होती. मंगळवारी अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. बारामती हा पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला समजला जातो. विरोधकांना आतापर्यंत हा किल्ला ढासळता आला नाही. यामुळे अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र युगेंद्र यांना उतरवण्याची शक्यता आहे. एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात असलेला हा एकमेव मतदारसंघ ठरेल, असे बोलले जाते.
नवे चेहरे चमत्कार घडवणार?
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण, त्यामध्ये नवाब मलिक (अनुशक्तीनगर ), बबनदादा शिंदे (माढा ), संजय शिंदे (करमाळा), सुनील टिंगरे (वडगाव शेरी ), बाळासाहेब आजबे (आष्टी पाटोदा शिरूर ) या विद्यमान आमदारांची नावे नाहीत. या आमदारांना टाळून राष्ट्रवादीने काँग्रेसमधून आलेले हिरामण खोसकर, सुलभा खोडके आणि भाजपा नेते राजकुमार बडोले यांना उमेदवारी दिली आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने कळवा मुंब्रा मतदारसंघातून नजीब मुल्ला, तर पाथरीमधून निर्मला विटेकर यांना उमेदवारी दिली आहे. हे चारही नवे चेहरे चमत्कार घडवून आणू शकतात, असे राष्ट्रवादीला वाटत आहे.
काका-पुतण्याचे सामर्थ्य ठरविणारी निवडणूक
शरद पवार यांची साथ सोडून आपल्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना उमेदवारी दिली जाईल, अशी ग्वाही अजित पवार देत होते. पण, त्यांनी आपलीच ग्वाही खोटी ठरवली आहे. अर्जुन मोरगावमधील विद्यमान आमदार मनोहर चंद्रकापुरे यांचे तिकीट कापून भाजपा नेते राजकुमार बडोले यांना उमेदवारी दिली आहे. त्यानुसार भाजपाच्या सांगण्यावरून नवाब मलिक यांचाही पत्ता काटला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात बहुतांश ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार असतील. यावरून काका-पुतण्यांचे राजकीय सामर्थ्य ठरविणारी ही निवडणूक असेल.
युगेंद्र पवार नेमके कोण आहेत?
युगेंद्र पवार अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र म्हणजेच अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. युगेंद्र पवार यांच्या मातोश्री सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. युगेंद्र पवार बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित असतात. युगेंद्र गेल्या 3 वर्षांपासून मोर्फा या सेंद्रीय शेती उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या संघटनेच्या माध्यमातून युगेंद्र पवारांकडून मेळावेही आयोजित केले जातात.
त्यामुळे 64 वर्षांनंतर पुन्हा पवार काका-पुतणे एकमेकांविरोधात उभे ठाकणार का या चर्चांना बारामतीत उधाण आलंय.
पण 64 वर्षांपूर्वी बारामतीत नेमकं काय घडलं होतं?
तर त्याचं झालं असं की 1960 मध्ये बारामती मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती. यावेळी ही निवडणूक यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शरद पवार यांचे मोठे बंधू वसंतराव पवारांना उमेदवारी देण्याची आली होती. याचवेळी शरद पवार यांनी काँग्रेसला मदत करत भावाविरोधात प्रचार केला होता. याचा परिणाम असा झाला की वसंतराव पवार पराभूत झाले आणि काँग्रेसचे गुलाबराव जेधे यांचा विजय झाला.
आता एक नजर टाकूया अजित पवार यांच्या कारकीर्दीवर..
अजित पवार 1991 पासून राजकारणात सक्रीय झाले. 1991 मध्येच अजितदादा बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडूनसुद्धा गेले. पण नंतर काका शरद पवारांसाठी अजित पवार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर सलग सहा वेळा अजित पवार विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. अजित पवार सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत.
आजही अजित पवार अनेकदा बारामती मतदारसंघात दौरा करतात. तिथल्या विकासकामांची ते आवर्जून पाहणी करतात. बारामतीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार जनता दरबार भरवतात. त्यामुळे बारामतीतला एक गट अजित पवारांच्या बाजूने असल्याचं लोकसभा निवडणुकीतही दिसून आलं. 2024ची विधानसभा निवडणूक बारामतीत पवार कुटुंबासाठी सोपी नसणारे. आपल्या सख्ख्या काकांविरोधात जर युगेंद्र पवार उभे राहिले तर पवार विरुद्ध पवार चुरस पुन्हा एकदा बारामतीकरांना बघायला मिळणार आहे. 64 वर्षांपूर्वी शरद पवारांनी जे केलं तेच आता पुन्हा होणार का? याचा फटका नेमक्या कुठल्या पवारांना बसू शकतो असं तुम्हाला वाटतं? हे आम्हाला कमेंट करुन सांगा..
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची यादी
जयंत पाटील – इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर
पृथ्वीराज साठे- केज
संदीप नाईक- बेलापूर
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
रविकांत बोपछे- तिरोडा
भाग्यश्री अत्राम- अहेरी
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वर्पे- कोपरगाव
प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी
करमाळा-नारायण पाटील
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे – कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
प्रशांत जगताप -हडपसर