दादा, जरा आमच्या रस्त्याचंही बघा ! बारामतीतील शिवाजी चौकच्या नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांना साद !
स्थानिक नगरसेविकेच्या पतीने काम बंद पाडल्याची नागरिकांमधून चर्चा

दादा, जरा आमच्या रस्त्याचंही बघा ! बारामतीतील शिवाजी चौकच्या नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांना साद !
स्थानिक नगरसेविकेच्या पतीने काम बंद पाडल्याची नागरिकांमधून चर्चा
बारामती वार्तापत्र
विकास कामांच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे कमालीचे चौकस असतात कोणतेही काम उच्च दर्जाचे व लवकरात लवकर, वेळेत पूर्ण होण्यासाठी सजग असतात. अगदी छोट्या छोट्या बारकाव्यां सह ते ठेकेदाराला चांगलेच सुनावतात. मात्र बारामतीतील शिवाजी चौक रस्ता याला अपवाद आहे त्यामुळे आता उपमुख्यमंत्री यात लक्ष घालणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे
बारामती मध्ये बहुचर्चित राहिलेला शिवाजी चौक येथील रुंदीकरणाचे काम गेले ते दीड वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे तेथील पथदिवे बंद आहेत. मात्र रोड रुंदीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे असून एका स्थानिक नगरसेवकाच्या दारात डिव्हायडर मध्ये जाण्याकरिता रस्ता सोडला जात नसल्यामुळे त्या नगरसेवीकेच्या पतीने ते काम बंद पडल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.
आज कित्येक महिन्यांपासून स्थानिकांना अंधारामध्ये बसावे लागत आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी वनवन ही करावी लागत. नगरपालिकेचा सर्व कर भरून देखील सुविधा मात्र मिळत नसल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
अधिकाऱ्यांनी तेथील अतिक्रमण विभागाची कारवाई करत असताना कोणताही दुजाभाव केलेला दिसून आला नाही. मात्र आशा विषयामुळे तेथील काम बंद असल्याने तेथील कॉन्ट्रॅक्टर पोलीस बंदोबस्तामध्ये काम करण्यार असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. आता त्या नगरसेवकावर कारवाई होणार का? व येथील डिव्हायडर कधी होणार याकडे सर्व स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच या रस्त्यावरील पथदिवे कधी लागणार असा सवाल नागरिक करत आहेत.