बहुजनांचा आधारवड राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती इंदापूरात साजरी.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभमीवर ती साध्या पद्धतीने साजरी होत आहे.
बहुजनांचा आधारवड राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती इंदापूरात साजरी…
यंदा कोरोनाच्या पार्श्वभमीवर ती साध्या पद्धतीने साजरी होत आहे.
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा आणि न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण सुरू करून मागासवर्गीय आणि दलितांना मानसिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी कसून प्रयत्न केले.
अशा लोकराजाची आज १४६ वी जयंती इंदापूर मधील साठेनगर या ठिकाणी साजरी करण्यात आली या ठिकाणी लोकराजा शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभागाच्या नगरसेविका राजश्री मखरे,अशोक मखरे सर व मुकुंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा.मखरे सरांनी शाहू महाराज यांना बहुजन चळवळीचा कणा असे संबोधले व शिवाजी शिंदे यांनी शाहू महाराजांबद्दल उपस्थित बांधवांना प्रबोधित केले
कार्यक्रमाच्या वेळी मा.नगरसेवक हरिदास हराळे,दादासाहेब सोनवणे,अशोकराव पोळ,तुषार ढावरे,कुणाल खडके,नागेश शिंदे,सतीश सागर,बापू अडसूळ,उमेश ढावरे,नवनाथ गावडे, मुरलीधर सोनवणे, बाळासाहेब चव्हाण,रोहित शिंदे,जनार्दन खरे व इतर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप उत्तम गायकवाड यांनी केला व आभार प्रदर्शन संदेश सोनवणे यांनी केले.
येथे विविध रोपट्यांचे रोपण करून दोन्ही कार्यक्रम सोशल डिस्टन्स ठेवून व कायद्याचे पालन करून करण्यात आले”