बहुजन मुक्ती पार्टीने पुकारलेल्या इंदापूर बंदला शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद
बहुजन मुक्ती पार्टीने पुकारलेल्या इंदापूर बंदला शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद
बारामती वार्तापत्र
इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने आज (दि.९) रोजी पुकारण्यात आलेल्या इंदापूर बंदला शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवले.या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील इतर सर्व व्यवहार पूर्णतः बंद होते.
दरम्यान पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्याविरोधात अँड.राहुल मखरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन समोर दि.१९ डिसेंबर रोजी अमरण उपोषण सुरू केले होते. दि.२० डिसेंबर रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपोषण स्थळास भेट देत अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना फोन केला.यावेळेस मोहिते यांनी भीमा कोरेगाव च्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याने दि.६ जानेवारी पर्यंत आम्ही इंदापूर चे पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्यावर कारवाई करतो असे आश्वासन दिले होते व त्यानंतर सदरील उपोषण मागे घेण्यात आले होते.
मात्र दि.६ जानेवारी पर्यंत पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज दि.९ जानेवारी रोजी इंदापूर शहरात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बंद चे आव्हान करण्यात आले होते.