स्थानिक
बाजारात आलोय मी काही कळ्या आणल्यात…स्वप्नकळ्या.. लावा बोली…करा किंमत
फुललेली स्वप्नं कोण वेडा बाजारात विकणार ???

बाजारात आलोय मी
काही कळ्या आणल्यात…स्वप्नकळ्या..
लावा बोली…करा किंमत
उमलायच्यात ना अजून
करेन सहन मी
हक्कच आहे तुमचा
चुरगळतील थोड्या
लाथाडल्या जातील काही
काहीजण हुंगतील अन् देतील भिरकावून
अन् काही तुडवल्या जातील पायदळी
मिटतील काही अन् तुटतीलही काही
स्वप्नकळ्या…
तरीही फुलतील
विश्वास आहे मला
पण फुलतील त्या दिवशी
पाकळ्यांचं काय घेऊन बसलात
सुगंधही असेल अनमोल
अमूल्य..
तुम्हाला नाही पेलवणार
ना मोल करूनही लाभणार…
फुललेली स्वप्नं
कोण वेडा बाजारात विकणार ???
राहुल जाधव
9764065600