स्थानिक

“बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘पावनखिंड दौड’चे यशस्वी आयोजन.”

"जय भवानी, जय शिवाजी", "शिवप्रेम जागवू या" अशा घोषणांनी परिसर दुमदुमवला.

“बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘पावनखिंड दौड’चे यशस्वी आयोजन.”

“जय भवानी, जय शिवाजी”, “शिवप्रेम जागवू या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमवला.

बारामती वार्तापत्र 

छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर मावळे आणि स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘पावनखिंड दौड’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

क्रीडा भारती आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. ग. भि. देशपांडे विद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाचे शाला समिती अध्यक्ष मा.अजय पुरोहित , महामात्र मा. डॉ. गोविंद कुलकर्णी व क्रीडा भारती पुणे चे अध्यक्ष मा. शैलेश आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी मा.श्री. किशोर कानिटकर , मा. श्री. धनंजय क्षीरसागर, मा. श्री. संदीप देशपांडे, मा. श्री. पुरुषोत्तम कुलकर्णी, मा. श्री. राजीव देशपांडे , मा. श्री. गौतम जाधव, राष्ट्रीय सायकल सायकलपट्टू कु. राधिका दराडे, मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे व शालेय पदाधिकारी उपस्थित होते .

या दौडीत विद्यार्थ्यांसह शिक्षक, संस्था पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पावनखिंडच्या ऐतिहासिक लढ्याची आठवण करून देणारी ही दौड देशभक्तीचा संदेश देणारी ठरली. उपस्थितांनी “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवप्रेम जागवू या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमवला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर व्याख्याते मा. विवेक पांडकर यांनी पावनखिंड पराक्रमाची शौर्यगाथा त्यांच्या व्याख्यानात विद्यार्थ्यांसमोर सादर केली .

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी क्रीडा भरतीचे अध्यक्ष मा. शैलेश आपटे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आयोजनामाचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. किशोर कानिटकर यांनी पावनखिंड दौड मध्ये भाग घेतलेल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पावनखिंड या ठिकाणी घडलेल्या या शौर्यगाथेबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. ऐतिहासिक दौड उपक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय, हरिभाऊ गजाननराव देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल, जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय तसेच सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा या शाळांच्या ५६१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

‘पावनखिंड दौड’मुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमानाची भावना निर्माण झाली असून, हा उपक्रम स्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल गोंजारी व आभार क्रीडाशिक्षक अनिल गावडे यांनी मानले.

Related Articles

Back to top button