कोरोंना विशेष

बाधित तरुणाचा चुलतभाऊ कोरोना पॉझीटिव्ह

कोल्हापूर, दि. 15: शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोना बाधित तरुणाच्या चुलत भावाचा कोरोना अहवाल आज पॉझीटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
मरकजहून जिल्ह्यात आलेल्या उचत येथील तरुणाचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यात या तरुणाच्या 24 वर्षीय चुलत भावाचा अहवाल आज पॉझीटिव्ह आला.

Back to top button