आपला जिल्हा

“बापासाठी लेक मैदानात!” काटी-लाखेवाडी गटात विकासाच्या विचारांचा घरोघरी प्रचार

नागरिकांमध्येही सकारात्मक वातावरण

“बापासाठी लेक मैदानात!” काटी-लाखेवाडी गटात विकासाच्या विचारांचा घरोघरी प्रचार

नागरिकांमध्येही सकारात्मक वातावरण

आदित्य बोराटे 

स्व.अजितदादांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. दादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची विकासाची दिशा आणि सर्वसामान्यांसाठीची तळमळ कायम जिवंत आहे, असे प्रतिपादन अक्षता श्रीमंत ढोले यांनी केले.

वरकुटे येथे काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत ढोले आणि पंचायत समिती गटाचे उमेदवार बापूसाहेब शेंडे यांच्या प्रचारासाठी घरोघरी भेटी देत असताना त्या बोलत होत्या. प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे हे दोघेही सोबत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून नागरिकांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विकासाच्या मुद्द्यावर आधारित प्रचारामुळे लोक आनंदाने आणि विश्वासाने सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

विकास हा केवळ शब्दांपुरता न राहता श्रीमंत ढोले यांनी प्रत्यक्ष कामातून दाखवून दिला आहे. विविध विकासकामांमुळे नागरिक त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात आणि त्यांच्यावर विश्वास व्यक्त करीत आहेत. महिला, युवक आणि सर्वसामान्य घटकांसाठी ते सातत्याने कार्यरत राहतील, असा विश्वास अक्षता ढोले यांनी व्यक्त केला.

महिलांचा आवाज बळकट करण्यासाठी, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून युवकांसाठीही विकासात्मक संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून विकासाच्या विचारांना साथ द्यावी आणि उमेदवारांना सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन अक्षता श्रीमंत ढोले यांनी केले.

Back to top button