बाप्पाचे विसर्जन विसर्जन तलावात करावे :- मुख्याधिकारी स्मिता काळे
नगर पंचायत होताच मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी प्रदुषण नियंत्रण
बाप्पाचे विसर्जन विसर्जन तलावात करावे :- मुख्याधिकारी स्मिता काळे
नगर पंचायत होताच मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी प्रदुषण नियंत्रण
बारामती वार्तापत्र
निरा डावा कालवा व विहिरीतील प्रदुषण नियंत्रणासाठी प्रथमच नगर पंचायत माळेगावच्या हद्दीत तिन ठिकाणी विसर्जन तलाव व निर्माल्य कुंड उभारण्यात आले असून या ठिकाणी विसर्जन करावे असे आवाहन मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले आहे.
माळेगावचे आता नगर पंचायत मधे रुपांतर झाले आहे. पुर्वी सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणपती निरा डावा कालवा व परिसरातील विहिरीत गणेश विसर्जन केले जात होते.यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होऊन जलसाठे खराब होत होते.मात्र नगर पंचायत होताच मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी प्रदुषण नियंत्रण ठेवण्यासाठी गणेश विसर्जनासाठी नगर पंचायत कार्यालय शेजारी, साठवण तलाव माळेगाव खुर्द रोड व माळेगाव कारखाना येथे विसर्जन तलाव व निर्माल्य कुंड उभारण्यात आले आहेत.तरी इतर ठिकाणी विसर्जन न करता या तीन ठिकाणी विसर्जन करावे व निसर्गाचे जतन करावे असे आवाहन केले आहे.