इंदापूर

बाभूळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शैला जावळे व उपसरपंच पदी नागनाथ गुरगुडे यांची निवड

बाभूळगावच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध राहणार असल्याचे मत केले व्यक्त

बाभूळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शैला जावळे व उपसरपंच पदी नागनाथ गुरगुडे यांची निवड

बाभूळगावच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध राहणार असल्याचे मत केले व्यक्त

इंदापूर : सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )

बाभूळगाव ग्रामपंचायतीच्या आज (दि.१०) रोजी झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्व राजकीय जाणकारांचे अंदाज चुकवत हर्षवर्धन पाटील समर्थक शैला सोमनाथ जावळे व उपसरपंचपदी नागनाथ भिवा गुरगुडे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कबीर बाळासाहेब कदम यांनी जाहीर केले.

बाभूळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक ही अत्यंत चुरशीने लढवली गेली. यामध्ये हर्षवर्धन पाटील समर्थक हनुमान ग्रामविकास पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय भवानी ग्रामविकास पॅनलला धूळ चारत नऊ पैकी नऊ जागांवर विजय मिळवत, बाभूळगाव ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व स्थापन केले. (दि १०) रोजी झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील शैला सोमनाथ जावळे व नागनाथ भिवा गुरगुडे यांच्या निवडीमुळे बाभूळगावकरांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी पॅनल प्रमुख जेष्ठ नेते कल्याण बापू गुरगुडे, कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक भास्कर आबा गुरगुडे,भाजपाचे युवा नेते अमोलराजे इंगळे,विठ्ठल मोरे, बाभूळगाव विकास सोसायटीचे माजी चेरमन दिपक गुरगुडे,मा.चेरमन पोपट भोसले,राजाभाऊ इंगळे, अर्जुन चितारे,सुरेश कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कबीर बाळासाहेब कदम, ग्रामसेवक रुपाली रंगनाथ व्यवहारे व गावकामगार तलाठी संदीप मैलागिरी यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram