गुन्हा दाखल होताच. दीड लाखाची मोटर सायकल फिर्यादीच्या दारात
सदर मोटारसायकल खरच चोरी गेली होती का दुसरा काही प्रकार आहे.

गुन्हा दाखल होताच. दीड लाखाची मोटर सायकल फिर्यादीच्या दारात
सदर मोटारसायकल खरच चोरी गेली होती का दुसरा काही प्रकार आहे.
क्राईम;बारामती वार्तापत्र
गुन्हा दाखल होताच. चक्क दीड लाखाची मोटर सायकल अज्ञात चोरट्यांनी परत फिर्यादीच्या दारात आणून सोडली आहे. दरम्यान चोरी गेलेली मोटार सायकल परत मिळाल्याने फिर्यादीने पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
सविस्तर माहिती अशी, तक्रारदार रॉबीन वसंतराव गायकवाड यांनी त्यांच्या मुलासाठी दोन वर्षापूर्वी बजाज कंपनीची ड्यू केटीएम २५० सीसी इंजिन असलेली मोटर सायकल क्रमांक (एम.एच ४२ ए डब्ल्यू ४३ ३४) दीड लाखाची मोटर सायकल विकत घेतली होती. सदर मोटरसायकल त्यांनी रात्रीच्या वेळेस कृष्णा गंगा अपार्टमेंट टीसी कॉलेज जवळ येथे पार्क करून ठेवली होती.
असता (दि: १७) डिसेंबर रोजी रात्री ती गाडी तिला संपूर्ण आटोमॅटिक लॉक असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली म्हणून (दि:२१) डिसेंबर रोजी बारामती शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
सदर गाडी महागडी असल्याने व सहजासहजी आरोपीला चोरून नेता येणे शक्य नसल्याने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ तपास पथकास सदर घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिसरात चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तपास पथकाने त्या ठिकाणी भेट दिली व चौकशी केली. दरम्यान त्याच्या दुसऱ्या दिवशीच रात्री सदरची मोटरसायकल परत फिर्यादीच्या दारात अज्ञात चोरट्यांनी रात्री आणून लावली.
सदर मोटारसायकल खरच चोरी गेली होती का दुसरा काही प्रकार आहे. याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. परंतु फिर्यादी हे मोटरसायकल मिळाल्यामुळे आनंदी असून त्यांनी पोलीस ठाण्याचे अभिनंदन केले आहे. सदरची मोटरसायकलचा तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगवान दुधे यांनी केलेला आहे. मोटरसायकल मिळाली असली तरीसुद्धा पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत