
बारामतीकरांची पाण्यासाठी वणवण
कॉंक्रिटीकरणास नागरिकांमधून विरोध
बारामती वार्तापत्र
सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवला असून संपूर्ण गांवेची गांवे पाण्याखाली गेली आहेत. मात्र बारामती मध्ये वाढीव हद्दीतील काही ठिकाणी पाण्यासाठी वणवण करत फिरावे लागत आहे. गेले काही दिवसांपासून अक्षरशः पाण्यासाठी भटकंती करावी लगत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
येथील नागरिकांचे जवळपास पंधरा दिवसांपासुन पाण्यावाचून हाल चालू आहेत. त्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चारी बाजूंनी बारामतीचा विकास चालू असून वाढीव हद्दीतील पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे तसाच्या तसाच पडलेला दिसून येत आहे. सध्या बारामतीमध्ये कॅनॉलचे कॉंक्रिटीकरण सुरू आहे मात्र कॅनॉल पासून काही अंतरावर असणाऱ्या रहिवासांनी आपल्या जमिनी मध्ये बोरवेल घेऊन कॅनॉलमधून होणाऱ्या पर्कॉलेशनमुळे कमी खोलीवर पाणी लागले आणि या काँक्रीटीकरणामुळे पर्कॉलेशन न होता बोरवेल मधील पाणी आटत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
त्यामुळे या भागात बोरवेल चे प्रमाण कमी होते परंतु कॅनॉल मधील काँक्रिटीकरणा मुळे या भागात बोरवेलचे प्रमाण अचानक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेथील लोकांना उन्हाळ्यात कॅनॉल चे पाणी बंद झाली कि पाण्यांच्या झळा सोसाव्या लागतात. आणि आता हे कायमस्वरूपी कॉंक्रिटीकरण झाल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्यंतरी कॉंक्रिटीकरणाचे काम चालू असताना या काँक्रिटीकरणास स्थानिक नागरिकांमधून खूप मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविल्यामुळे हे काँक्रीटीकरणाचे काम काही काळ बंद ठेवण्यात आले होते परंतु अचानक काम चालू झाल्याने बारामती सहित वाढीव हद्दीतील लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
याविरोधात भाजपाचे पदाधिकारी यांनी पाटबंधारे खात्यास वेळोवेळी पत्रव्यवहार करून आपला विरोध दर्शवला आहे. पण म्हणतात ना सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्यातीलच हे एक जिवंत उदाहरण आहे.
स्थानिकांमध्ये या कॉंक्रिटीकरणाचा खूप आक्रोश दिसून येत आहे. तरी प्रशासनाने या गंभीर बाबी चा विचार करून यावर काहीतरी तोडगा काढावा असे साकडे मनोमनी नागरिक घालत आहेत. त्याच बरोबर कॅनॉलच्या मधोमद जाळी लावण्याचेही काम करण्यात यावे जेणेकरून कोणी या कॅनॉल मधून वाहून गेल्यास त्या जाळीत अडकेल या सर्व बाबी उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहोचाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.