बारामतीकरांना दिलासा… काल दिवसभरात फक्त ३० पाॅझिटीव्ह.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या २८३२ वर गेली आहे.
बारामतीकरांना दिलासा… काल दिवसभरात फक्त ३० पाॅझिटीव्ह.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या २८३२ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (०४\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने ११८. एकूण पॉझिटिव्ह- २६. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०१. कालचे एकूण एंटीजन १४. एकूण पॉझिटिव्ह-०४ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २६+०४=३०. शहर-१५ . ग्रामीण- १५. एकूण रूग्णसंख्या-३४८८ एकूण बरे झालेले रुग्ण- २८३२ एकूण मृत्यू– ८९.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये खताळपट्टा येथील २८ वर्षीय महिला, कऱ्हावागज येथील २ वर्षीय मुलगा, मोरगाव येथील ४७ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील १५ वर्षीय मुलगा, तांदूळवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
अंबिकानगर येथील ४० वर्षीय महिला, २० वर्षीय पुरूष, १५ वर्षीय मुलगा, काटेवाडी येथील ८० वर्षीय महिला, करंजेपूल येथील ७२ वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३० वर्षीय पुरूष, सांगवी येथील ४५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
अशोकनगर येथे एक कुटुंब कोरोनाबाधित झाले असून यामध्ये येथील २८ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय महिला, २१ वर्षीय पुरूष, ४७ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सोमेश्वरनगर येथील ३१ वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील ४६ वर्षीय पुरूष, सुभाष चौक येथील ६५ वर्षीय पुरूष, श्रीरामनगर येथील ३६ वर्षीय पुरूष, खताळपट्टा येथील १० वर्षीय मुलगी, खाटिकगल्ली येथील ३७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
खताळपट्टा येथील ४५ वर्षीय महिला, खंडोबानगर येथील ४३ वर्षीय पुरूष, वसंतनगर येथील २४ वर्षीय महिला, माळेगाव येथील ६६ वर्षीय पुरूष, सोरटेवाडी येथील २४ वर्षीय पुरूष, मोरगाव रोड बारामती येथील ४० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीत काल शासकीय रॅपीड अॅंटीजेन तपासणी केवळ १३ जणांची झाली. यामध्ये गुनवडी येथील २७ वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे येथील २७ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील २६ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल खासगी डॉ. पवार लॅबोरेटरी मध्ये झालेल्या रॅट तपासणीत मुरूम सालोबावस्ती येथील ५५ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे.